आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पौड गणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा द्या; पंचायत समिती सदस्या काजल मोरे

Swati Jain   85   03-07-2026 12:08:46

Pune 

मुळशी प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील पौड पंचायत समिती गणातील विविध गावांमधील महिला बालक विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कासाठी व शाळेतील मागणीसाठी मुळशी पंचायत समितीच्या सदस्य काजल अंकुश मोरे यांनी आज पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची भेट घेत निवेदन देत त्यांनी मागणी केली आहे.

पौड गणातील महिला, बालके व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांच्याकडे केले आहे त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत आपण बैठक लावून असे आश्वासन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या

  1. प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता.
  2. प्रत्येक शाळेत स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहांची उभारणी.
  3. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV यंत्रणा बसविणे.
  4. CRP महिलांच्या मासिक मानधनात वाढ करणे.
  5. CRP महिलांना प्रवास भत्ता मंजूर करणे.
  6. CRP महिलांना शासकीय कामकाजासाठी टॅब उपलब्ध करून देणे.
  7. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.
  8. महिला बचत गटांना बाजारपेठ, प्रदर्शन व विक्रीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.