आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सचिन अहिर पवारांच्या नेतृत्वाखाली तयार; उपसभापती निवड झाल्यानंतर फडणवीस काय म्हणाले?

शरद लाटे  60   02-07-2026 11:23:33

Pune News 

शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे सचिन अहिर यांना मंगळवारी (30 जून) विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला नव्याने शह दिला.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने नाट्यमयरित्या सचिन अहिर यांनी अर्ज भरला. सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर आज (01 जुलै) सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांचे कौतुक केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून सचिन अहिर यांनी एक कार्यकाळ गाजवला आणि मोठ्या प्रमाणात पक्षाचा विस्तार करण्याचं कार्य त्यांनी केले. पुढे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. 2019 खरं म्हणजे ते निवडणूक लढतील असं सुरू होतं. पण जी काही पक्षातली परिस्थिती होती, त्याच्यामुळे त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेसाठी संधी मिळाली. दोन्ही आमचे मित्र विधान परिषदेमध्ये आले आणि विधान परिषदेमध्ये आल्यानंतरही सुरुवातीला उद्धव ठाकरेंचा काळ आणि नंतर एकनाथ शिंदे व मी अशा काळामध्ये सचिन अहिर यांच्यावर जी जबाबदारी आली, त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.