आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Nitin Gadkari : नितीन गडकरींना धक्का; मंत्रालयात होणार फेरबदल; PM मोदी घेणार मोठा निर्णय?

शरद लाटे  355   28-06-2026 17:27:10

Pune 

केंद्रीय मंत्रिमंडळात पुढील काही दिवसात फेरबदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात कुणाला संधी देणार याबाबत देखील सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे मंत्रिमंडळात पंजाब आणि उत्तर प्रदेशाला मोठी संधी मिळणार आहे. तर दुसरीकडे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयात देखील फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं देखील नाव आहे. नीट पेपर फुटीप्रकरणातून चर्चेत असणारे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. तर आता त्यांच्याकडून शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी काढून घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नावांचा समावेश आहे.

शक्तिकांत दास नवे अर्थमंत्री ?

तर दुसरीकडे आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि सध्याचे पंतप्रधानांचे प्रधान सचिव असलेले शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना देखील मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. निर्मला सीतारामन यांच्या जागी देशाचे नवीन अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) , बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि खासदरा राघव चड्ढा यांना देखील पंतप्रधान मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. तसेच तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून भाजपमध्ये आलेले सुखेंदू शेखर रॉय यांनाही या फेरबदलात संधी मिळू शकते.

या मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबकडे विशेष लक्ष दिले जाण्याची अपेक्षा आहे. सध्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांच्या जागी पंजाबमधील एखादे शीख व्यक्तिमत्त्व किंवा तेथील एखादा प्रमुख नेता मंत्रिमंडळात समाविष्ट केला जाऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंजाबमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.