आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

टेंडर नाही, स्पर्धा नाही; मग ३८ गुंठे जागा ग्रॅव्हिटी फाउंडेशनला कशी मिळाली?

नितीन देशपांडे   52   23-06-2026 10:29:41

Pune News 

पुणे : कोथरूड परिसरातील महापालिकेच्या सुमारे ३८ गुंठे जागेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने एका संस्थेला वापरासाठी देण्याच्या प्रस्तावावर सोमवारी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत जोरदार चर्चा झाली.

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक प्रशांत जगताप आणि चंदूशेठ कदम यांनी या विषयाला तीव्र विरोध करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

सभेत या जागेचे वाटप, निवड प्रक्रिया, निविदा न काढता जागा देण्यामागील कारणे तसेच महापालिकेच्या मालमत्तेचा वापर याबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदविले. प्रशासनाच्या वतीने उपायुक्त आशा राऊत यांनी विषयाची पार्श्वभूमी स्पष्ट करत महापालिकेच्या नियमांनुसार प्रस्ताव आणण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही या प्रस्तावाचे समर्थन करत ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मत मांडले. मात्र विरोधकांनी समाधान न झाल्याने चर्चेदरम्यान वातावरण तापले.

अखेर नगरसचिव योगिता भोसले यांनी विषयाला विरोध कायम असल्याने मतदानाची प्रक्रिया राबविली. मतदानात सत्ताधारी पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रस्तावाला बहुमत मिळाले आणि विषय मंजूर करण्यात आला.

या निर्णयानंतर महापालिकेच्या मालमत्तेच्या वाटप प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधी पक्षाने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे संकेत दिले आहेत


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.