आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

नागरिकांच्या पैशातून आलिशान गाड्या? पिंपरी महापालिकेच्या निर्णयाची चर्चा

शरद लाटे  257   18-06-2026 15:31:58

Pune 

 

मोदी यांनी आर्थिक बचतीचे धोरण स्वीकारले असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून 'होऊ द्या खर्च' सुरू आहे. महापौरांसाठी तब्बल ३० लाख रुपयांची तर, आयुक्तांसाठी १९ लाखांची अलिशान गाडी खरेदी करण्यात येणार आहे.

 

खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि. १७) झालेल्या सभेत मंजुरी दिली.

 

महापौर रवी लांडगे यांच्यासाठी महिंद्रा एक्सईव्ही इलेक्ट्रिक अलिशान वाहन निविदा न मागविता थेट पद्धतीने खरेदी केले आहे. त्याची किमत २९ लाख ३५ हजार ३६७ रुपये इतकी आहे, तर परिवहन कार्यालयाकडे वाहन नोंदणी व वाहन विमा असा एकूण १५ हजार २०० रुपये खर्च केला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासाठी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड हे १८ लाख ८० हजार ७२१ रुपये किमतीचे आलिशान वाहन खरेदी केले आहे. निविदा न काढता थेट पद्धतीने खरेदी केली आहे. वाहननोंदणी, विम्यासाठी १५ हजार २०० रुपये खर्च आहे. ही दोन आलिशान वाहने खरेदी करणे व त्याची आरटीओत नोंदणी खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे

 

आकुर्डी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालय येथील दैनंदिन साफसफाई व स्वच्छता कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे व साहित्य उपलब्ध करून यांत्रिक पद्धतीने स्वच्छता सेवा सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देणे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जनजागृतीसाठी रिक्षा व स्पीकर भाडे तसेच, कर्मचाऱ्यांचे मानधन देणे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती कार्यक्रमासाठी १७ लाख खर्च झाला आहे.

 

महापालिकेचे चिंचवड येथील ऑक्सिजन पार्क उद्यान नारी द वुमन या खासगी संस्थेला थेट पद्धतीने देखभालीसाठी देण्यात आले आहे. डिसेंबर २०२२पासून ३० जूनपर्यंत सहा सहा महिन्यांची एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, पुनावळे येथील ऑक्सिजन पार्क हे उद्यानही थेट पद्धतीने त्या संस्थेला १८ महिन्यांसाठी देखभाल व सुरक्षेसाठी दिले आहे. ही मुदत ३१ मार्चला संपली आहे. आता ही दोन्ही उद्याने पुन्हा त्या संस्थेला १८ महिने मुदतवाढीस ५५ लाख खर्चासह थेट पद्धतीने चालवण्यास देण्यास उद्यान विभागाने प्रस्ताव ठेवला होता. निविदा न काढता थेट पद्धतीने काम देणे नियमात नसल्याचे कारण देत तो प्रस्ताव समितीने दप्तरी दाखल केला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.