आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ठाकरे गटाच्या या 2 खासदारांनी बिघडवला एकनाथ शिंदे यांचा गेम?

शरद लाटे  386   18-06-2026 10:02:44

Pune 

 

राजकारणत मोठी खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी तसे पत्र देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.

 

ज्यानंतर दिल्लीत घडामोडी वाढल्या. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 6 खासदारांसोबत बैठक घेतली. हे खासदार दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्याचे सांगितले जात होते. ठाकरे गटाच्या 2 खासदारांमुळे मोठा गेम होऊ शकतो. मात्र, शिंदे गटाकडून दावा केला जात आहे की, आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून फक्त घोषणाच बाकी आहे. यादरम्यानच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम दोन खासदारांनी केला. ज्यामुळे ते मोठ्या कोडींत अडकले आहेत, असा शिवसेना ठाकरे गटाचा मोठा दावा आहे.

 

त्यांचे म्हणणे आहे की, बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर सही केली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर सहीच केली नाही. हे दोन्ही खासदार बुधवारी दिल्लीत नव्हते. 6 खासदारांमधील बंडखोरीमध्ये नाव आल्यानंतर संजय पाटील यांनी म्हटले की, मी या गोष्टींला आता थकलो आहे.

 

 

 

मला शिंदे गटाकडून कोणतेही आमंत्रण देण्यात आले नाही. मी त्यांच्याकडे का जाऊ? मी कोणत्याही खासदाराच्या संपर्कात नाही. त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांनी देखील 20 जूननंतर जे काही आहे, ते स्पष्ट करू म्हटले आहे. लोकसभा अध्यक्षांना एक पत्र 6 खासदारांकडून स्वतंत्र गट तयार करण्याकरिता देण्यात आले. मात्र, त्यावर ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांची सही नसल्याचा दावा करण्यात आला. जर असे घडले असेल तर हा अत्यंत मोठा गेम शिंदे गटाचा म्हणावा लागेल.

 

या दोन खासदारांमुळे त्यांचे ऑपरेशन टायगर फेल होऊ शकते आणि मोठा गेम होऊ शकतो. मात्र, शिंदे गटाकडून दावा केला जात आहे की, आमचे ऑपरेशन यशस्वी झाले. फक्त घोषणा बाकी आहे. कायदेशीर बाबी तपासून शिंदे गटाकडून दोन दिवसात घोषणा केली जाऊ शकते. हा उद्धव ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का आहे. काल संजय राऊत थेट पत्रकार परिषदेमध्ये शिव्या देतानाही दिसले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.