Pune
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील स्वारगेट परिसरात शनिवारी मोठी धडक कारवाई करण्यात आली. स्वारगेट बस स्थानक आणि परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या तसेच विविध विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएचे विशेष पथक सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तासह पथकाने स्वारगेट बस स्थानक परिसरातील खाद्य व्यवसायांवर अचानक तपासणी मोहीम सुरू केली. (Tukaram Mundhe)
अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेची तपासणी
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध हॉटेल्स आणि दुकानांमधील अन्नपदार्थांचा दर्जा, साठवणूक व्यवस्था, स्वच्छता आणि परवान्यांची तपासणी केली. अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित व्यावसायिकांना कडक समज देण्यात आली. (Tukaram Mundhe)