Pune News Devendra Fadnavis पुढच्या वर्षी कुंभ सुरु होण्याच्या आधी यातील ९० टक्के काम पूर्ण केले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील 'भीमाशंकर हेरिटेज व्हिलेज'च्या विकास आराखड्याची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला संपूर्ण देशात मोठी मान्यता आहे. या ज्योतिर्लिंगाचे काम आपण सुरु केले होते, ज्यात मूळ मंदिराचे सभामंडप, जीर्णोद्धार आणि परिसर विकासाचा समावेश आहे. प्रशासनाने अतिशय वेगाने याचे काम केले आहे. अतिशय चांगल्या प्रतीचे आणि वेगाने काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो."
५ ते १० पटीने भाविकांची संख्या वाढणार
ते पुढे म्हणाले की, "आता होणाऱ्या परिसर विकासामध्ये इथे परिवर्तन होणार आहे. मागच्या काळात यासाठीचा आराखडा मंजूर केला. या आराखड्यात गावातल्या लोकांनी दाखवलेले सहकार्य महत्वाचे आहे. जवळपास १५० घरांचे पुनर्वसन होत असून त्यांना बाजूलाच जागा देऊन गाव तयार करण्याचा चंग आम्ही बांधला आहे.