आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

या बँकेवर मोठी कारवाई, RBI ने थेट. तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार?

नितीन देशपांडे   136   13-06-2026 19:15:37

Pune 

भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचा विचार करून मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे आरबीआयने या बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत.

आता बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढण्याची परवानगी असेल. हे निर्बंध 12 जून रोजी कामकाज संपल्यानंतर लागू झाले असून पुढील सहा महिन्यांसाठी ते प्रभावी राहणार आहेत. तसेच या निर्बंधांचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. यामुळे बँकेच्या खातेदारांच्या व्यवहारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बँक काय करू शकणार नाही?

आरबीआयच्या निर्देशांनुसार, मोगावीरा सहकारी बँक आता कोणतेही नवीन कर्ज मंजूर करू शकणार नाही किंवा विद्यमान कर्जांचे नूतनीकरण (रिन्यूअल) करू शकणार नाही. तसेच बँकेला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करता येणार नाही. नवीन आर्थिक दायित्वे स्वीकारणे, कर्ज घेणे किंवा नवीन ठेवी स्वीकारणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने ही बंधने लादताना म्हटले की, बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेऊन ठेवीदारांना त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यातून कमाल 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देण्यात येईल.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.