आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज – मिलिंद वाळंज

नितीन देशपांडे   305   04-06-2026 11:55:18

पुणे जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत वाळंज यांच्या सूचना

पुणे प्रतिनिधी -: पुणे जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळांत इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यास उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी सहमती दर्शवली असून याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या माध्यमिक शाळांचे उच्च माध्यमिक शाळांमध्ये (कनिष्ठ महाविद्यालय) रुपांतर होणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला समितीचे अध्यक्ष विवेक वळसे पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील भारतीय जनता पार्टीचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील शिवसेनेचे गटनेते विजयसिंह शिंदे जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज शिक्षण समितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे सदस्य तथा समितीचे सदस्य मिलिंद वाळंज यांनी बैठकीत काही सूचना केल्या यावेळी ते म्हणाले की दहावी ते बारावी पर्यंत शाळा वाढविण्याचा निर्णय हा ग्रामीण भागाला लाभदायी आहे त्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती तथा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे आभार मानत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे देखील आभार मानले.

विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्कशॉप व उपक्रमाच्या मागणीला मोठे यश शिक्षण समितीच्या बैठकीत नवीन वर्कशॉप कॅम्पस उपक्रम राबवणे याची सदस्यांनी मागणी केली होती अखेर त्या मागणीला यश आले आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद वाळंज यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी विविध सूचना मांडल्या. यावेळी ते म्हणाले की, दहावीपर्यंत असलेल्या शाळा बारावीपर्यंत वाढविण्याचा निर्णय ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

या निर्णयाबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती तथा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे आभार मानले.

बैठकीत विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्कशॉप, कॅम्पस आणि विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याची मागणी सदस्यांनी केली होती. अखेर या मागणीला यश मिळाल्याने विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यावेळी बोलताना मिलिंद वाळंज यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होणे, बीईओ स्तरावरील कामकाजाचा नियमित फॉलोअप तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त उपक्रम राबविणे या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

बैठकीत मिलिंद वाळंज यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून ग्रामीण शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

शिक्षण समितीच्या बैठकीत मिलिंद वाळंज यांनी केलेल्या मागण्या

- जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळांमध्ये ‘नीट' आणि ‘जेईई’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करा.

-  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. 

- बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई) मोफत प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्राप्त सर्व अर्जांची सखोल छाननी करावी.  

- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक केंद्र शाळेत कला, क्रीडा आणि विशेष शिक्षकांची नियुक्ती करावी. 

- झेडपीच्या मोठ्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्रे (Counciling centres)  सुरू करावेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.