आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटवून घ्यायला सांग

नितीन देशपांडे   303   30-05-2026 17:55:36

Pune 

संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Case) आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक वळण समोर आले आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर (Dada Khindkar) याला या केसमध्ये साक्ष न देण्यासाठी आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्याच्या सख्ख्या लहान भावानेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Beed Crime Santosh Deshmukh Case: नेमकं काय घडलं?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर हा संतोष देशमुख प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय आहे. दादा खिंडकर हा आपल्या घरी असताना, त्याचा लहान भाऊ समाधान खिंडकर हा त्या ठिकाणी आला. त्याने जुन्या वादाची कुरापत काढत दादा खिंडकरला थेट बजावले की, "तू धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस. ते प्रकरण मिटवून घ्यायला सांग."

Beed Crime Santosh Deshmukh Case: भावा-भावांमधील वाद चव्हाट्यावर

लहान भावाच्या या धमकीवजा इशाऱ्यावर दादा खिंडकरने, "तुला याच्याशी काय करायचे आहे? तू तुझे काम कर," असे उत्तर दिले. या उत्तराचा राग मनात धरून लहान भाऊ समाधान खिंडकर याने दादा खिंडकरला शिवीगाळ केली. या प्रकारानंतर दादा खिंडकरने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने दखल घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर या दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक आणि इतर कारणांवरून वाद सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दादा खिंडकर याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. मात्र, थेट हत्या प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी सख्या भावानेच धमकी दिल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.