Pune update
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस कमी होण्याचं नाव घेत नाही. मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात तू-तू-मैं-मैं झाल्याचं कळत होते.
मंत्री भुजबळांनी हे नाकारलं असलं होते; तरी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर आपल्याला 'टार्गेट' करण्यात आलं, अशी खंत सुनील तटकरेंनी बोलून दाखवली होती, असे मंत्री हसन मुश्रीफांनी सांगितलं.
यानंतर आता खासदार पार्थ पवार आणि मंत्री भुजबळ यांच्यात चांगलाच खंडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. पार्थ पवार आणि मंत्री भुजबळांमध्ये वादाचं कारण ठरलंय एक कंत्राट… पार्थ पवारांनी कंत्राटाबद्दल एका व्यक्तीला भुजबळांकडे पाठवले होते, पण तेव्हा भुजबळांनी ठेकेदाराला माघारी पाठवून दिले. यानंतर भुजबळांनी शरद पवारांचे दाखले दिल्याचे माहिती एका मराठी वृत्तपत्रानं सूत्रांकडून हवाल्यानं दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीने अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं. राज्यस्तरावरील एक कंत्राट ठराविक ठेकेदाराला द्यावे, असे म्हणत पार्थ पवारांकडून ठेकेदाराला मंत्री भुजबळांकडे पाठवले होते. पण, भुजबळांनी ठेकेदाराला कंत्राट देण्याचं नाकारलं. अमुक ठेकेदाराला का काम द्यायचे, याची 'विशिष्ट कारणे'ही ठेकेदारानं भुजबळांना सांगितलं. यावरूनच पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.
तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनीही कधी अशा पद्धतीने मला सांगितलं नव्हते, अशा शब्दांत भुजबळांनी पार्थ पवारांकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर, 'असे असेल तर मला तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल,' अशा शब्दांत पार्थ पवारांनी भुजबळांना सांगितलं वृत्त वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
याबद्दल प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, "कंत्राट कोर्टात अडकलं आहे. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आहे. कंत्राट काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया आहे. त्या माध्यमातून जे पात्र ठरतील, त्यांना कंत्राट दिले जात असते. असे कोणाला द्यायचे म्हणून कंत्राट कसे देता येईल? आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही. काही गोष्टी समजुतीने करायच्या असतात. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही. सध्या निविदा कागदपत्रांची तपासणी आणि अंतिम प्रक्रिया अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीमार्फत सुरू असून, कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश देण्यात आलेला नाही."
पार्थ पवारांनी म्हटलं, "आमच्याविषयी, विशेषतः माझ्याविषयी, जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. असे काहीही झाले नाही. मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही."