आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी झटका

शरद लाटे  284   26-05-2026 12:22:19

Pune देशभरातील वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरांतही सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

आज, 26 मेपासून सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या नव्या दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 83.09 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या 15 मेनंतर ही चौथी दरवाढ असून, मागील 11 दिवसांत सीएनजीच्या दरात एकूण 6 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी 2 रुपये, 18 तारखेला 1 रुपया आणि 23 मे रोजी 1 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता 26 मे रोजी पुन्हा 2 रुपयांची वाढ झाल्याने वाहनचालकांच्या खर्चात मोठी भर पडली आहे.सीएनजी दरवाढीचा सर्वाधिक परिणाम दिल्ली-एनसीआर भागात जाणवण्याची शक्यता आहे. कारण या परिसरात ऑटो रिक्षा, टॅक्सी, शाळेच्या व्हॅन तसेच खासगी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सीएनजीचा वापर केला जातो. ऑटो रिक्षाचालकांनी वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनाच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज सामुद्रधुनी परिसरात इराणने घातलेल्या निर्बंधांमुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा परिणाम इंधन पुरवठा आणि किमतींवर होत आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाली होती, त्यानंतर आता सीएनजीही महागला 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.