आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

जनगणनेची माहिती घेतानाच शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

शरद लाटे  222   26-05-2026 11:56:02

Pune जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना सांगोल्यातील राजाराम दामोदर ढोले (वय ४९) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेत ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. राजाराम ढोले यांची जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ढोले हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात जनगणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम करत होते. त्याचवेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर येऊन पडल्याने सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील आदर्श सहशिक्षक राजाराम दामोदर ढोले (वय ४९, रा. ढोलेमळा, सांगोला) यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना काल सोमवार दि.२५ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास सांगोला येथील पाटील-चौगुले वस्ती येथे घडली.

कडक उन्हात घेत होते घरांची नोंदणी

​केंद्र शासनाच्या 'जनगणना-२०२७' या राष्ट्रीय मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील घर यादी आणि घर गणनेचे काम १६ मे पासून सुरू झाले आहे. या मोहिमेत राजाराम ढोले यांची 'प्रगणक' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते सांगोला नगरपालिका हद्दीतील पाटील-चौगुले वस्ती भागात घरोघरी जाऊन माहिती गोळा करत होते.

​दुपारी १२ च्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढल्याने त्यांना अचानक असह्य त्रास होऊन चक्कर आली आणि उलट्या होऊन ते जमिनीवर कोसळले.

​उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

​घटना घडताच नातेवाईक अमोल कोरे यांनी अत्यंत तत्परतेने खाजगी वाहनातून त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंभूराजे साळुंखे यांनी दिलेल्या माहितीवरून सांगोला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सोमवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

​'आदर्श शिक्षक' हरपल्याने सर्वत्र हळहळ

​मृत राजाराम ढोले हे केवळ एक शिक्षक नव्हते, तर ते सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्राप्त सन्माननीय शिक्षक होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव, सामाजिक व धार्मिक कार्यातील अग्रसेर सहभाग यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार, पालक आणि विद्यार्थी वर्ग होता.
​त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असतानाच त्यांना वीरमरण आल्यासारखी ही भावना असून, त्यांच्या अशा अचानक जाण्याने सांगोला शहर आणि शिक्षण क्षेत्रात तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.