Pune
साताऱ्याहून कर्दे बीचला फिरण्यासाठी गेलेल्या साताऱ्यातील 8 युवकांचा पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार पंधराशे फूट खोल दरीत जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती..
यामधील सर्वांना महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या माध्यमातून त्यांचे दरीतून मृतदेह काढण्यात यश आले असून यामधील 5 मृतदेह आसगाव येथील असल्यामुळे संपूर्ण आसगाव मध्ये शोककळा पसरली.
रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास 5 जणांचे मृतदेह गावामध्ये दाखल झाल्यानंतर घरातल्यांचा आक्रोश हा हृदय पीळवटून टाकणारा होता… यावेळी युवकांचे मृतदेह दोन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने स्मशानभूमीत आणल्यानंतर एकावेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले… दरम्यान मर्ढे गावातील दोन युवकांवर आणि खटाव मधील एकावर पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण गाव सुन्न झालेले पाहायला मिळाले.. या घटनेमुळे अनेकांना आपले अश्रू अनावर झाले…