आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Walmik Karad: वाल्मिकच्या गँगचा माज काही उतरेना! सुनावणीत जजसमोर उडवली कॉलर, सगळेच संतापले;

नितीन देशपांडे   87   21-05-2026 19:22:58

Pune 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी अजूनही कमी झालेला पाहायला मिळत नाही. आरोपींनी आज कोर्टात केलेल्या मुजोरीची चर्चा आज बीडमध्ये दिवसभर रंगली आहे. कायद्याचा कोणताही डर नसलेले वर्तन आज कोर्टासमोर आले

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 जून रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत आरोपींच्या उद्धट वर्तनाने कोर्टाच्या आवारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. मात्र, कायद्याचा किंवा न्यायालयाचा कोणताही आदर न राखता आरोपींनी थेट स्क्रीनसमोरच आपली कॉलर उडवून दाखवली. त्यांच्या या कृत्यामुळे उपस्थित सर्वजण अवाक झाले.

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?


या धक्कादायक प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, नराधम आरोपींना त्यांच्या कृत्याचा कसलाही पश्चाताप नाही. त्यांची आजची उद्धट वागणूक सन्माननीय न्यायाधीश साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी स्वतः पाहिली आहे. हे आरोपी किती निर्ढावलेले आहेत, हे सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशांनी या गोष्टी अधिकृतपणे चार्जशीट आणि कोर्टाच्या रेकॉर्डवर नमूद कराव्यात, अशी आमची विनंती आहे.

लॅपटॉपमधील कॉपीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


खटल्याच्या कामकाजादरम्यान, आरोपी जयराम चाटे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात म्हणणे मांडले. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेत पुन्हा एकदा लॅपटॉप चा जुनाच मुद्दा पुढे करत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात माहिती देताना सरकारी पक्षाचे वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले की, आरोपी विष्णू चाटे याच्याकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत न्यायालयात कुठलाही अधिकृत अर्ज सादर करण्यात आलेला नाही.

कडक कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


आरोपींच्या या वर्तनामुळे त्यांच्यावर कडक कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आता सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.