आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द

नितीन देशपांडे   47   21-05-2026 16:58:10

Pune 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना- २०२६'साठी राज्यातील सहकार उपनिबंधकांसह संबंधित कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा- सुट्या रद्द केल्या आहेत.

जे रजेवर गेले आहेत, त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश आज काढण्यात आले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची घोषणा यापूर्वीच राज्य शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने शासनाला आवश्‍यक ती माहिती केव्हाही लागू शकते. यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रजा-सुट्यांचा आढावा घ्यावा, ज्यांना यापूर्वी रजा दिल्या आहेत, किंबहुना जे रजेवर आहेत, त्यांना कार्यालयात उपस्थित ठेवावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांच्या व्हीसीवर झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधक, तालुका, सहायक निबंधक, वर्ग-२ मधील अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयात आणि कार्यालयात उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-2026'

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-2026' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

या योजनेचा लाभ ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जदार शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जाचा यात समावेश असणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.