आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

नटबोल्ड'वरून सभागृहात हास्यकल्लोळ! महापौर म्हणाले, परदेश नव्हे आता.

शरद लाटे  216   16-05-2026 00:26:30

Pune 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. खुल्या व्यायामशाळेचे ‘नटबोल्ड’ निघाल्याचा मुद्दा सभेत मांडल्याने हास्यकल्लोळ उडाला.

परदेशवारी रद्द झालेल्या महापौरांनी आता दिल्लीवरी करू अशी मिश्किल टिप्पणी केली.

सोलापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाड हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिला दोन लाख ९९ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बाबासाहेब त्रिभुवन व मनीषा चिंचवडे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत ठेवला होता. तसेच, दिव्यांग क्रिकेट संघात निवड झालेला साजिद तांबोळीसह श्रेया तरस या खेळाडूंनाही अर्थसहाय्य देण्याची मागणी ऐश्वर्या तरस यांनी केली. या बाबतच्या क्रीडा धोरणावरील चर्चेत रेश्मा कातळे, राहुल कलाटे आदींनी सहभाग घेतला.

या विषयावर बोलताना निगडी, प्राधिकरणातील भाजप नगरसेविका शैलजा मोरे यांनी प्रभागातील खुल्या व्यायामशाळेचे ‘नटबोल्ड’ निघाल्याचा मुद्दा मांडला. ठेकेदार दाद देत नसल्याचे त्यांनी सांगितले. हाच धागा पकडून ठेकेदार आणि अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नसून सभागृहात एका ‘नटबोल्ड’वरून चर्चा करण्याची वेळ येते आयुक्त साहेब हे योग्य आहे का? असा सवाल सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी उपस्थित केला. यावरून सभागृहात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला.

PCMC General Body Meeting : भाजपची उमेदवारी मिळाली नाही, पण मानधनावर 'नगरसचिव'…

परदेश दौरा रद्द झाल्याची महापौरांना सल

शहरातील खेळाडूंसाठी चांगले स्टेडियम उभारावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्या परदेशवारी करता येणार नसली तरी दिल्लीवारी करून उच्च दर्जाचे स्टेडियम उभारले जाईल, असे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले. मात्र, परदेश दौरा रद्द झाल्याची महापौरांच्या बोलण्यातून सल दिसून आली.

नियोजन समितीची स्थापना रखडली

विकास आराखड्यावरील (डीपी) आलेल्या ५० हजार हरकतींवरील सुनावणीसाठी नियोजन समितीची स्थापना पुन्हा रखडली आहे. भाजपची स्थायी समितीच्या तीन सदस्यांची नावे निश्चित होत नसल्याने पुन्हा हा विषय तहकूब करण्यात आला आहे. दरम्यान, हरकतींवर सुनावणी घेऊन आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्याकरिता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय सभावृत्तांत मंजूर

महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पाच हजार ६५५ कोटी रुपयांचा आहे. राज्य व केंद्र सरकारचे अनुदान मिळून नऊ हजार ३२२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. मार्च २०२७ अखेर सुमारे पाच कोटी रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज आहे. त्यासाठीच्या उपसूचनांसह आणि आवश्यक दुरुस्तीसह अर्थसंकल्पीय सभा वृत्तांत कायम करण्यात येत असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.