Pune
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच आता पहिली दरवाढ समोर आली आहे. अमूलने आापल्या ग्राहकांना धक्का दिला आाहे. अमूल दुधाच्या दरात २ रुपये प्रति लिटर वाढ केली आहे.
अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केली आहे. नवीन दरवाढ ही आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पॅकेजिंगसाठी खर्च वाढत असल्यामुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
500 ml अमूल म्हशीचं (A2) दूधाची किंमत 37 रुपयांवरून 39 रुपये करण्यात आली आहे. तर 1 लिटर अमूल गोल्ड दुधाची किंमत 67 रुपयांवरून वाढली असून आता 69 रुपये मोजावे लागणार आहे. तर 1 लीटर अमूल टी स्पेशल ची किंमत 63 रुपये होती, ती आता 66 रुपये झाली आहे. अमूल ताजा आणि शक्ति दूधाच्या किंमतीही वाढ केली आहे.
आता इतर दूध कंपन्या वाढवणार दर
अमूलने आपल्या दुधाच्या दरात २ रुपये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता याचा परिणाम इतर दुधांच्या दरावर होणार आहे. महाराष्ट्रातील गोकुळ, मदर्स डेअरी, प्रभात, महानंदा आणि इतर दूधाच्या दरातही वाढ आता अटळ आहे. उन्हाळ्यामध्ये नेहमी दुधाच्या दरात वाढ होत असते. पण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलं आहे, त्यानंतर आता पहिली दरवाढ ही दुधाची ठरली आहे.
चहा-कॉफी महागणार?
अलीकडे चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्यात आली. चहा आणि कॉफीच्या दरात २ रुपये वाढ झाली होती. आता दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे चहा विक्रेत्यांकडून आता चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.