आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

उन्हामध्ये पत्र्याच्या झळा, झोळीत झोपलेली चिमुकली उठलीच नाही..! औसा तालुक्यातील गोंदीत ९ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नितीन देशपांडे   60   27-04-2026 15:55:36

लातूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उकाड्यामुळे जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. औसा शहरानजीक येथील ६० वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर आता औसा तालुक्यातील गोंदी येथे अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिव्या नेताजी गोंदे (मूळ रा. पुंजी, ता. निलंगा) असे या मृत बालिकेचे नाव आहे.

चिमुकलीची आई गीता नेताजी गोंदी येथे माहेरी आली होती. ४ एप्रिल रोजी बाळाचे बारसे आणि पथ्याचे कार्यक्रम असल्याने घरात प्रचंड उकाडा होता. त्यात पत्र्याच्या घरामुळे प्रखर तापमानाचा फटका बसला. तिला हलक्याच मळमळण्याच्या आणि अंगात बेचैनीच्या तक्रारी होत्या. मात्र शनिवारी दुपारी बाळ अचानक बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला..

उन्हाचे आणि झोळांचे तीव्र फटके

शिव्या गोंदे ही ९ महिन्यांची चिमुकली आईसोबत माहेरी गोंदी (ता. औसा) येथे आली होती. माहेरी घर कमी उंचीच्या पत्र्याचे असल्याने तिथे प्रचंड उष्णता होती. पत्र्याच्या झळांमुळे झोळीत झोपलेल्या बाळाला उष्णतेचा आणि झळांचा तीव्र फटका बसल्याचे सांगितले जात आहे. तिची हलचाल मंदावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिचे दुर्दैवी निधन झाले.

टिप:- फोटो AI निर्मीत आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.