आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यात ४२ कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघड! २ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक | आरोपी फरार

शरद लाटे  163   22-04-2026 23:34:20

पुण्यात पुन्हा एकदा मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. तब्बल २,००० गुंतवणूकदारांना सुमारे ४२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संतोष बंडाळ आणि ज्ञानेश्वर चोरगे यांची नावे समोर आली असून दोघेही सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींनी “जास्त परतावा आणि कमी वेळात दुप्पट पैसे” या आमिषावर लोकांना आकर्षित केले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास जिंकला आणि नंतर मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले. अनेकांनी आयुष्यभराची बचत आणि कर्ज काढूनही या योजनेत गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.

मात्र काही काळानंतर परतावा थांबल्याने संशय निर्माण झाला आणि अखेर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. तक्रारीनंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी छापे टाकून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे “जलद नफा” देण्याच्या आमिषांपासून सावध राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य पडताळणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.