आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील भुगाव येथील विद्यार्थिनींना सायकल वाटप

शरद लाटे  425   16-04-2026 17:27:25

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील भुगाव येथील विद्यार्थिनींना सायकल वाटप

खासदार सुप्रियाताई सुळे व महादेव अण्णा कोंढरे यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रम यशस्वी

मुळशी प्रतिनिधी -: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक्य सुविधा मिळाव्यात याच उद्देशाने पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे यांच्या विशेष प्रयत्नातून आज भूगाव येथे सायकल वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.

भूगाव येथील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.

 या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविताताई दगडे, मुळशी पंचायत समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे, आजी माजी सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य गावकरी पालक वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मुळशी तालुका अध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे म्हणाले की,  पवार चॅरिटेबल ट्रस्ट व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा संसदरत्न सुप्रियाताई सुळे आज आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलचे वाटप करण्यात आले यामुळे दुर्गम भागातील व लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे; आपल्या भागाच्या विकासासाठी खासदार सुळे यांचा मोठा हातभार नेहमीच लागत असतो असे देखील कोंढरे म्हणाले.

या सामाजिक उपक्रमाबद्दल पालकांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत, अशा शैक्षणिक सहाय्यक योजना भविष्यातही सुरू ठेवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.