आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

शरद लाटे  471   13-04-2026 12:05:42

Pune ज्योतिर्लिंग भीमाशंकरनंतर आता अष्टविनायकातील रांजणगाव महागणपती मंदिर तब्बल तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे.

मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव ट्रस्टसमोर ठेवण्यात आला आहे. ज्योतिर्लिंग भीमाशंकरनंतर आता अष्टविनायकातील रांजणगाव महागणपती मंदिर काही दिवसांसाठी नव्हे तर तब्बल तीन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला

मंदिर बंद ठेवण्याचं कारण काय?

अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत रांजणगाव महागणपती मंदिर परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे सुरू असताना मंदिर काही काळासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. विशेष म्हणजे, पुरातत्त्व विभागाकडून अंदाजे तीन महिने मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, यावर अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीत होणार आहे.दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टचा मानस असल्याची माहिती समोर येत आहे.

अष्टविनायक मंदिराचा विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. रांजणगाव गणपती या मंदिराचा समावेश आरखड्यात करण्यात आला आहे. यात मंदिराची दुरुस्ती आणि परिसर व्यवस्थापन इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. महागणपती मंदिरातील आवार, गाभारा आणि मंदिरासभोवतीची दगडी फरसबंदी, नगारखान्याचे काम करण्यात येणार आहेत. ही बांधकामे मंदिर सुरू ठेवून करता येणं अवघड आहे.

तसेच ही कामे वेळेत पूर्ण करणे आणि पर्यटकांना आणि भाविकांना काही इजा होऊ नये, यासाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवून विभागाच्या ताब्यात देणं गरजेचे असल्याचं पत्रात पुरातत्त्व विभागाने म्हटलंय.

भीमाशंकर मंदिर ३१ मेपर्यंत बंद

याआधी पुण्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिरदेखील बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमाशंकर मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ९ एप्रिल ते ३१ मे पर्यंत भाविकांच्या नियमित दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.