Pune
भोंडू अशोर खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून चाकणकर कुटुंबांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रुपाली चाकणकरांच्या भगिणी प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी नोटीस धाडली असून पुढील पाच दिवसात जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
समता पतसंस्थेतील संशयास्पद खाती आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे व्यवहार यामुळे आता चाकणकर कुटुंबीयांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. तसेच भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांची एकूण चार खाती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये दोन खाती स्वतः प्रतिभा यांच्या नावे असून उर्वरित दोन खाती त्यांच्या मुलांच्या नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या चारही खात्यांमधून गेल्या काही काळात तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. इतक्या मोठ्या रकमेचा स्रोत काय आणि हे व्यवहार नेमके कोणाशी झाले, याचा शोध आता पोलीस घेणार आहेत.
प्रतिभा चाकणकरांच्या दोन पत्त्यांवर नोटीस पाठवली
भोंदू बाबा अशोक खरात याचे या पतसंस्थेशी असलेले संशयास्पद संबंध समोर आले आहेत. पतसंस्थेतील खात्यांवरून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या आणी मुलांच्या नावेही समता पतसंस्थेत चार खाते आहेत. सध्या पोलिसांकडून खातेदारांचे जबाब घेण्याचं काम सुरू आहे. आत्तापर्यंत 33 खातेदारांनी जबाब नोंदवले आहेत. प्रतिभा चाकणकर यांनाही जबाब देण्यासाठी शिर्डीत पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. शिर्डी पोलीसांकडून चाकणकर यांच्या दोन पत्यावर पोस्टाने नोटीस पाठवली असून पुढच्या पाच दिवसात जबाब देण्यासाठी हजर राहावे लागणार आहे.
सिन्नरला खरातची 32 खाती सापडली
हे प्रकरण केवळ शिर्डीपुरते मर्यादित राहिलेले नाही. सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतही अशोक खरात नॉमिनी असलेली 32 खाती सापडली आहेत. या खात्यांची चौकशी आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून केली जाणार आहे. एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या शहरांतील पतसंस्थांमध्ये इतके प्रभावी कनेक्शन या मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे.
प्रतिभा चाकणकर यांना नोटीस मिळाल्यानंतर त्या चौकशीला कधी हजर राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचे नाव या प्रकरणात आल्याने आता या तपासाला राजकीय वळण लागण्याचीही चिन्हे आहेत.