आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Ring Road: पुण्यातील अखेर रिंगरोड प्रकल्पाला गती; भरपाई दर निश्चित!

शिंदे राम   289   08-04-2026 15:18:40

Pune 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी इनर रिंगरोड प्रकल्पाला आता वेग आला आहे. त्यासाठी ११ गावांतील १२० हेक्टर जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून जमिनींचे भरपाई दर निश्चित केले आहेत.

या प्रकल्पातील सोळू ते वडगाव शिंदे या पहिल्या टप्प्यातील भूसंपदनासाठी पीएमआरडीएने ११३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण, मोजमाप व भरपाईचा अहवाल तयार करून तो पीएमआरडीएकडे सादर केला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच मोठे पूल उभारण्याची तरतूद आहे.

रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आलेली आहे. ११ गावांतील जमिनींची सयुंक्त मोजणी पूर्ण झाली आहे. जमीन संपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

- डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयाला ४२.३० किलोमीटर लांबीच्या भू-संपादनाचे प्रस्ताव

४०.८२ किमीच्या भू-संपादनाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु

पहिला टप्पा - सोलू ते पुणे-अहिल्यानगर महामार्ग (१०.४० किमी)

सोलू ते वडगाव शिंदे या ४.७० किमीचे काम

पीएमआरडीए करणार

  • लोहगाव ते पुणे-अहिल्यानगर महामार्ग या ५.७० किमीचे काम पुणे महापालिका करणार

  • सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे गावांसाठी भरपाई दर अंतिम, भूसंपादन लवकरच

  • सोलू ते वडगाव शिंदे या ४.७ किमी पट्ट्यातील टप्प्यासाठी २८ हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.