आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट

शरद लाटे  107   08-04-2026 12:58:23

Pune 

इस्राइलने इराणविरुद्ध सुरू केलेलं युद्ध आज अखेर ४० दिवसांनंतर थांबलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षादरम्यान दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे.

तसेच इराणनेही युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र अमेरिकेतील एका गटाकडून युद्धविरामाच्या घोषणेवरून ट्रम्प यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या संघर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प झुकले आणि त्यांनी इराणसमोर सरेंडर केले, अशी टीका अमेरिकेचे सिनेटर ख्रिस मर्फी यांनी केली आहे.

एका अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना ख्रिस मर्फी म्हणाले की, इराणविरुद्धच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्ण पराभव झाला आहे. त्यांनी इराणसमोर सरेंडर केलं आहे. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण देण्यास सहमती दर्शवली आहे. ही बाब संपूर्ण जगासाठी असामान्य आणि घातक आहे, अशी टीका मर्फी यांनी केली आहे.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाच्या चर्चेचा भाग म्हणून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याची परवानगी इराण आणि ओमानला दिली जाऊ शकते. हा निर्णय जागतिक व्यापारातील एक मोठा बदल असेल. त्याचं कारण म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारा जलमार्ग हा अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय जलमार्ग मानला जात होता. तसेच तिथून जाण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नव्हतं.

आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधून मिळणाऱ्या रकमेचा वापर इराण युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी करू शकतो. तर याबाबत ओमानची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. आता या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.