आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, 'कोणाचा डाऊनफॉल होईल ते

नितीन देशपांडे   339   07-04-2026 12:31:20

Pune 

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्यानंतरही आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणुकीत (Baramati Bypoll 2026) पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला होता. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती. पार्थ पवार यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करुन प्रत्युत्तर दिले.(Maharashtra Politics news) त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole On Parth Pawar: पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, खरंतर निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे, त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केलेला आहे. अशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचा काही कारण नाही, असं पटोले म्हणालेत. तर पार्थ पवारांच्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ते वेळ सांगेल, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, त्यामुळे मला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचीच नाही.

Congress On Parth Pawar: काँग्रेसने पार्थ पवारांना दिलेलं उत्तर

महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सोशल मिडीया एक्सवरून पार्थ पवारांचं नाव न घेता पोस्ट शेअर करत म्हटलंय की, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?", असं म्हणत काँग्रेसने उत्तर दिलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.