Pune
देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.
दरवर्षी प्रतिक्विंटल २८०० ते ३२०० रुपये दर मिळणाऱ्या गव्हाला यंदा २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत असून सुमारे ६०० रुपयांचा फटका बसत आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ साठी २३२५ रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात तोही मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी पुरेशी थंडी, पोषक वातावरणात रब्बी गहू पिकाचे चांगले उत्पादन झाले. काहींना तर एकरी १२ ते १५ क्विंटल याप्रमाणे गव्हाचे उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी आनंदात असताना बाजारपेठेतील गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली. उत्पादन खर्च निघणार किंवा नाही, यामुळे गहू उत्पादक शेतकरी हताश झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली जातात, तर रब्बीमध्ये गहू व हरभरा पिकवले जाते. मात्र यंदा खरीप हंगामातच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादन घटले. त्यानंतर काही भागात झालेल्या गारपिटीनेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे आधीच नुकसान आर्थिक अडचणीत आता गव्हाच्या घसरलेल्या दराचा दुहेरी फटका बसत आहे. एकरी खर्चाचा हिशोब पाहता आता शेतकऱ्यांच्या हाती काही ठरते की नाही हाच मोठा विषय आहे.
प्रत्येकवेळी शेतपिकांचेच दर का पडतात
सध्या आखाती देशात युध्दजन्य परिस्थिती आहे. १५०० अशात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यासह अनेक वस्तुच्या किमती एकाएकी वाढल्या. युद्ध असो, महागाई असो किंवा जागतिक तणाव याचा परिणाम इंधन, गॅस, खाद्यतेल यांसारख्या वस्तूंवर थेट दिसतो; पण शेतमालाच्या बाबतीत उलट चित्र दिसते. देशात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी प्रत्येकवेळी शेतपिकांचेच दर का पडतात असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.