आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune मेट्रोच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; बोअरवेलमुळे पाणी गळतीचा प्रकार

नितीन देशपांडे   496   25-03-2026 05:57:41

Pune 

घराखालून भूमिगत मेट्रो मार्गिका गेली असल्याची माहिती असताना एका घर मालकाने कूपनलिका (बोअरवेल) घेतल्याने स्वारगेट-पिंपरी भूमिगत मेट्रो मार्गिकेत पाणी गळती झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात ही घटना नुकतीच घडली. त्यानंतर मेट्रोतील अधिकाऱ्यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एका घर मालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक (स्थापत्य अभियांत्रिकी) शंतून गोरात्रा यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खडक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या घर मालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते पिंपरी मार्गिका भूमिगत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या मेट्रोचा मार्ग भूमिगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन जाणारी ही मार्गिका भूमिगत आहे. स्वारगेट मंडई, कसबा पेठ, शिवाजीनगर न्यायालय, शिवाजीनगर एसटी स्थानक ही स्थानके भूमिगत आहे. खडकी रेंजहिल्स ते पिंपरी दरम्यान मेट्रोचा मार्ग उन्नत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर खडक पोलीस ठाणे आहे. खडक पोलीस ठाण्यासमोर शुक्रवार पेठेतील घर क्रमांक ४१५ आहे. या वाड्याच्या मालकाने बोअरवेल घेतली. भूमिगत मार्गिका घराखालून जाते, याची माहिती घरमालकाल होती. १४ मार्च रोजी भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या एका भागातून (मास्क) पाणी गळती सुरू झाली. मेट्रातील अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली. घराखालून मेट्रो मार्गिका जात असल्यचाी माहिती असूनही बोअरवेल घेण्यात आली. त्यामुळे बोगद्याच्या एका भागाला छिद्र पडले. या छिद्रातून मेट्रो मार्गिकेत गळती झाली. मेट्रो मार्गिका राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निधीतून साकारण्यात आला अहे. घरमालकाच्या कृत्यामुळे मेट्रोच्या मालमत्तेची अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असलेल्या खडक पोलीस ठाण्यासमाेरील एका वाड्यात बोअरवेल घेण्यात आली होती. बोअरवेलमुळे मेट्रो मार्गिकेत पाणी गळती झाल्याने मेट्रोकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. – शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.