आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर

शरद लाटे  261   24-03-2026 17:35:05

Pune news - 

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडाला. जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यात आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे.

भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामधील ९ थेट सरपंच आणि ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (Pune gram panchayat by-election 2026 full schedule)

पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाचले आहे. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या ९ थेट सरपंच आणि ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे, तर २९ एप्रिलला निकाल जाहीर केला जाणार आहे. निधन,राजीनामा आणि इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० मार्चला तहसीलदारांकडून नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर ७ ते १३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.१५ एप्रिलला अर्जाची छाननी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे..२८ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान आणि २९ एप्रिलला मतमोजणी होईल, असे सांगण्यात आले आहे.

भोर तालुक्यात निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी आपल्या जागांसाठी जुळवाजुळव केली जात आहे. विविध इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात..रिक्त जागेवर प्रबळ, सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी गावागावात रणनीती आखली जात आहे. भोर तालुक्यात सध्या निवडणुकीचे वार वाहत आहे. ९ सरपंच कोणत्या पार्टीचे होणार, याकडे भोर तालुक्याचे लक्ष लागलेय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.