आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Satara ZP Election : साताऱ्यात पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, भाजपला शेवटपर्यंत थांगपत्ता नव्हता

शरद लाटे  56   24-03-2026 11:32:11

Pune 

सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाच्या निर्देशांमागे पडद्याआडून घडलेल्या गोष्टींचा भाजपला पत्ताच नव्हता, अशी माहिती आता पुढे आली आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

शेवटपर्यंत भाजपला थांगपत्ता नाही

विधान परिषदेत सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून देण्यात आले. त्यावर सभागृहात उपस्थित असलेले वनमंत्री गणेश नाईक तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारकडून या कारवाईला मान्यताही दिली. मात्र, हे सर्व अशा घाईघाईत झाले की याचा शेवटपर्यंत भाजपला थांगपत्ता लागला नाही.

शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात मतमतांतरे होती. अशावेळी बहुमत नसतानाही भाजपने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, या निवडणुकीदरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मंत्री शंभुराज देसाई यांना दुखापत झाली. त्याचसोबत मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबतही पोलिसांची झटापट झाली. यावरून विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक झाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.