आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Sunil Tatkare: राष्ट्रवादीच्या बॅनर वरून चाकणकर, तटकरे गायब? खरात प्रकरणादरम्यान एक फोटो आला समोर

शरद लाटे  401   21-03-2026 11:50:45

Sunil Tatkare: सुनील तटकरे अडचणीत? अशोक खरात प्रकरणादरम्यान एक फोटो आला समोर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या बॅनर वरून चाकणकर, तटकरे गायब

पुण्यात आयोजित 'आधार' या राज्यस्तरीय बैठकीच्या बॅनरवरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेत्या रूपाली चाकणकर यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मराठा समाजातील नेत्यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. अघोरी पूजेच्या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, म्हणूनच या दोन्ही नेत्यांना बाजूला सारले जात असल्याची चर्चा आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक फोटो समोर आल्याने त्यांचीही अडचण वाढण्याची शक्यता आहे.

अनामिका कापल्याचा दावा

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांच्यावर अघोरी विद्या केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. भोंदूबाबा अशोक खरातच्या सांगण्यावरून चाकणकर यांनी 2 सप्टेंबर 2024 (सोमवती अमावस्या) रोजी स्वतःच्या हाताची अनामिका (Ring Finger) कापली होती, असा दावा अंधारेंनी पुराव्यानिशी केला होता.

अंधारे यांनी या अघोरी विधीत आणखी एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचे म्हटले होते, पण नाव जाहीर केले नव्हते. आता सुनील तटकरे यांच्याही अनामिकेला पांढरी पट्टी लावलेला फोटो व्हायरल झाल्याने, तो 'दुसरा नेता' तटकरे आहेत का? अशी चर्चा रंगू लागली आहे. सुनील तटकरे याबाबत काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तंत्र-मंत्र विद्येत 'अनामिके'चे महत्त्व

अध्यात्म आणि तंत्रशास्त्रात अनामिका बोट अत्यंत प्रभावशाली मानले जाते. हे बोट सूर्य (यश, अधिकार) आणि शुक्र (आकर्षण, सत्ता) या ग्रहांशी संबंधित आहे. मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी या बोटाचा वापर केला जातो. अघोरी पूजेमध्ये रक्ताचा नैवेद्य किंवा शरीराचा भाग अर्पण केला जातो, अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रकार परिषेदत दिली होती.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.