आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर;

शरद लाटे  359   03-03-2026 18:12:03

Pune 

irst BJP List For Rajya Sabha Elections Out राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर हालाचालींना वेग आला असून आता भाजपने त्यांची यादी जाहीर केलीय. यात राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यांना बिहारमधून राज्यसभेसाठी भाजपने उमेदवारी दिलीय. नितीन नवीन यांच्यासोबत पक्षाने दलित नेते शिवेश कुमार राम यांनाही उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेते ५ मार्चला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

नितिन नवीन यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. मूळचे पटनाचे असलेले नितीन नवीन हे बांकीपूर मतदारसंघातून आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ते राज्यसभा खासदार होणार याची चर्चा सुरू होती. आता भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

 

भाजपने बिहारमधून त्यांच्या कोट्यातून शिवेश राम यांनाही उमेदवारी दिलीय. ते दलति नेते असून पक्षाने त्यांना २०२४ मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत शिवेश राम यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. भोजपुरी अभिनेता पवन सिंहला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती पण त्याचं नाव यादीत नाही.

 

भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, नितीन नवीन, शिवेश राम यांच्याशिवाय राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा हेसुद्धा एनडीएचे राज्यसभा उमेदवार असतील. तर दोन जागांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षातील उमेदवारांची नावे असणार आहेत.

 

इतर राज्यातून कुणाला संधी

 

आसामधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांना उमेदवारी दिलीय. तर छत्तीसगढमध्ये लक्ष्मी वर्मा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर केलंय. हरियाणातून संजय भाटिया यांना तर ओडिशातून प्रदेशाध्यक्ष मोहनलाल सामल आणि सुजीत कुमार यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलीय.

 

देशातील ३७ राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या असून त्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील जागांसाठीची उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. महाराष्ट्रातील नेते अजूनही वेटिंगवर आहेत. महाराष्ट्रातील ७ जागांपैकी भाजपकडे ४ जागा असणार आहेत. त्या जागांसाठी २५ जण इच्छुक असून त्यापैकी काही नावांचा प्रस्ताव महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीला पाठवला असल्याचं म्हटलं जातंय. आता भाजप महाराष्ट्रात कुणाला संधी देणार हे पाहावं लागेल.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 लोकांच्या प्रतिक्रिया


PCMC तहलका
Vaijanath Bhaskarrao shep 03-03-2026 18:22:08

Pritam Tai GopinathRao munde Saheb


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.