ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठ्या निधीची मागणी करणार
मुळशी प्रतिनिधी -: गेल्या काही दिवसांपूर्वीच अनेक वर्षापासून रखडले गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या माण हिंजवडी आयटी नगरी जिल्हा परिषद गटात भाजपाचे राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत विजय खेचून आणला.
जिल्हा परिषद गटातून भाजपाचे शिवाजी बुचडे पाटील हे विजयी झाले तर हिंजवडी पंचायत समिती गणातून ऐश्वर्या वाघमारे ह्या विजय झाल्या.
आमच्या प्रतिनिधी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की माण हिंजवडी जिल्हा परिषद गटातील ग्रामीण व शहरी पट्ट्यातील अनेक प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत यामध्ये प्रामुख्याने रस्ते, स्ट्रेट लाईट, पाणी, आरोग्य व जिल्हा परिषद गटातील शाळा यावर अधिकचा भर देऊन येथील समस्या सोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून निश्चित विकास साध्य करता येईल असा आशावाद बुचडे पाटील यांनी केला.
आयटी नगरीतील व गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापन करणार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'पीएमआरडीए'च्या आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बुचडे पाटील, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य महानगर अभियंता रिनाज पठाण यावेळी उपस्थित होते.
स्वच्छतेसंदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, प्रगत सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे आणि कार्यक्षम तसेच किफायतशीर सांडपाणी प्रक्रिया राबवून नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती आणि उद्योगासारख्या कामांसाठी पुनर्वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे.