Pawar National President : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी एका महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
आजची साप्ताहिक बैठक सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. अजित पवार ज्या पद्धतीने पक्षाचे आणि प्रशासकीय कामांचे नियोजन करायचे, अगदी त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीचे कामकाज हाताळले. विशेष म्हणजे, गेल्या २-३ दिवसांत त्यांनी मंत्रालयातील विविध बैठका घेऊन आपल्या कामाची चुणूकही दाखवून दिल्याचं म्हटलं जात आहे.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
यावेळी बारामती आणि मंत्रालयाशी संबंधित कामांचा आढावा सुनेत्रा पवार यांनी घेतला. आगामी निवडणुका आणि अर्थसंकल्पातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. २३ फेब्रुवारीला शोकसभा आयोजित करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच दिवशी अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी तारखाही निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.