आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मोशी–बोऱ्हाडेवाडी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढवा; पोलिसांना निवेदन – नगरसेवक निखिल बोऱ्हाडे

शरद लाटे  197   13-02-2026 21:23:03

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी :

मोशी–बोऱ्हाडेवाडी परिसरात अलीकडे घडलेल्या अनुचित प्रकारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून संबंधित भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी निखिल बोऱ्हाडे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

मोशी–बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी तसेच चिखली परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी नगरसेवक बोऱ्हाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शाळा व रात्रीच्या वेळेत विशेष गस्तची मागणी

सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेच्या वेळेत तसेच रात्रीच्या वेळी बोऱ्हाडेवाडी व जाधववाडी परिसरात नियमित गस्त वाढवावी. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.

या भागात अनेक महिला नाईट शिफ्टवरून ये-जा करत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी तात्काळ गस्त व पेट्रोलिंग फेरी वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नगरसेवक बोऱ्हाडे यांनी केली आहे.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक निखिल बोऱ्हाडे म्हणाले की, “शाळेच्या वेळेत, दुपारच्या तसेच रात्रीच्या वेळी भुरट्या चोरट्यांच्या हालचाली रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गस्त आणि पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली आहे.”

पोलिस प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक त्या ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.