आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

34 पौड-अंबडवेट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांची विजयाकडे वाटचाल

शरद लाटे  440   06-02-2026 10:25:32

34 पौड-अंबडवेट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांची विजयाकडे वाटचाल

मुळशी प्रतिनिधी -: पुणे जिल्ह्यातील अत्यंत हाय होल्टेज जिल्हा परिषद गट म्हणून पौड-अंबडवेट हा जिल्हा परिषद गट ओळखला जातो,

येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान पडणार आहे, तर निकाल 9 तारखेला असणार आहे

याच पार्श्वभूमीवर 34 पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मिलिंद वाळंज यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

नात्यागोत्याचे समीकरण ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते असे देखील बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शंकर मांडेकर व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाबा कंधारे यांनी देखील आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मिलिंद वाळंज यांनी देखील डोअर टू डोअर प्रचार करत प्रत्येक मतदारांशी त्या वैयक्तिकरित्या भेट घेत आपुलकीने चौकशी करून भावनिकतेने मतदान मागताना दिसून आले आहेत.

नात्यागोत्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार; मिलिंद वाळंज यांची तगडी यंत्रणा सज्ज

आमच्या प्रतिनिधी वाळंज यांना विचारले असता ते म्हणाले, रस्ते आरोग्य शाळा दैनंदिन नागरी सुविधा याचबरोबर आपल्या भागाच्या शाश्वत विकासासाठी जगाच्या नकाशावर उठून दिसेल असं मुळशीचं सौंदर्य आहे, हे सगळ बरोबर आहे. हे करत असताना लोकांना त्या त्या पातळीवरच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. बालि सोबत स्पर्धा करण्याची क्षमता येथे आहे असंही ते म्हणाले. तसंच, माझ्याकडं माझ्या भागाच्या विकासाचा एक प्लॅन आहे तो मी मला संधी मिळाली तर राबवणार आहे. तसंच, राष्ट्रवादी पक्षाची लाईनच आहे की कार करत आहोत काम करत राहू तसं आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत असंही ते म्हणाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.