आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजितदादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, रामदास कदमांचे गंभीर आरोप

शरद लाटे  506   06-02-2026 08:00:28

Pune 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार गेल्यानंतर सुनिल तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचे रामदास कदम म्हणाले. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचे तटकरे म्हणाले.

अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं. दहा दिवस गेले असते तर काय झालं असतं? असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला. शरद पवार ताबा घेतील या भीतीने वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही असे कदम म्हणाले. सुनील तटकरे विश्वासघातकी. आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठ केलं त्यांना संपवण्याचे काम तटकरे यांनी केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. लोकसभेत त्यांना मी निवडून आणले मात्र योगेश कदम यांना पडण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी रामदास कदम यांनी केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.