आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपोळी जवळ, केमसेवाडी, पडळघरवाडी, रिहे, घोटावडे, मुलखेड, चांदे, नांदे गावकऱ्यांच्या शिवसेनेला भव्य प्रतिसाद
मुळशी प्रतिनिधी -:: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे, शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्हा परिषद माण-हिंजवडी गट क्र. ३५ चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री. बाबासाहेब चंद्रकांत साखरे आणि मुळशी पंचायत समिती माण गण क्र. ६९ च्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पायल प्रशांत रानवडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाचे उपनेते अनिल पडवळ व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या उपस्थितीत आंधळे,कातरखडक, खांबोली,पिंपोळी जवळ,केमसेवाडी, पडळघरवाडी, रिहे,घोटावडे, मुलखेड,चांदे,नांदे येथे नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे म्हणाले की; तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास कामे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, शिवसेना हा पक्ष नेहमीच विकासाचे राजकारण करतो पण 80% समाजकारण व 20 टक्के राजकारण या अजेंड्यावर चालणारा पक्ष असल्यामुळे आपल्या भागाच्या विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आव्हान केले.
शिवसेनेचे उपनेते अनिल पडवळ म्हणाले की; हिंजवडी जिल्हा परिषद शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री. बाबासाहेब चंद्रकांत साखरे व मुळशी पंचायत समिती माण गण क्र. ६९ च्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पायल प्रशांत रानवडे यांना प्रचंड बहुमताने लाडक्या बहिणी विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेने अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिल्यामुळे जिल्हा परिषद गटातील व मुळशी पंचायत समिती गटातील आमचे उमेदवार मोठ्या मताने विजय होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.