आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजित पवारांचं 100 कोटींचं विधान अन् मग दुर्दैवी अपघात;

शरद लाटे  179   05-02-2026 10:54:58

Pune बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांचा अपघात हा दुर्दैवी आहे. अजित पवार गेल्यानंतर आता सिंचन घोटाळ्याबाबत (Sinchan Scam) न्यायालयावरील विश्वास उडाला आहे. अपघाताची चौकशी करणाऱ्या डीजीसीएचा अहवाल काय येईल, यावर तात्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे (Vijay Pandhare) यांनी शंका उपस्थित केली. दरम्यान, विजय पांढरे यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळा प्रकरणी काही धक्कादायक आरोप केले होते. (Vijay Pandhare On Ajit Pawar Death)

विजय पांढरे नेमकं काय काय म्हणाले? (Vijay Pandhare On Ajit Pawar Death)

अजित पवारांबाबत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे , घटनेवर अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या व शंका येईल अशा काही घटनाही घडलेल्या आहेत. अजित पवारांनी भाजपच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असं म्हटलं आणि त्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला. त्यामुळे अनेकांना यात शंका वाटते. मात्र यात कुठलाही घातपात नाही, असं मला वैयक्तिक वाटतं.अशा अपघातांची चौकशी DGCA करेलही आणि त्या चौकशीचा अहवाल मात्र सरकार आपल्या मर्जीप्रमाणे तयार करेल अशी शंका मला आहे. सत्य लपवून ठेवले जातात असा माझा अनुभव आहे, असा धक्कादायक दावा विजय पांढरे यांनी केला आहे.

न्यायालयावरील आमचा विश्वास उडाला- विजय पांढरे (Vijay Pandhare On Ajit Pawar Death)


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.