आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शिवाजी बुचडे पाटलांना सोसायट्यांत बैठकीचा धडाका; मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद

नितीन देशपांडे   496   03-02-2026 11:09:12

माण - हिंजवडी गटात सोसायटी धारकांचा भाजपाला एकतर्फी पाठिंबा

हिंजवडी प्रतिनिधी -: हिंजवडी-माण गटातील भाजपचे अधिकृत उमेदवार शिवाजी बुचडे (पाटील) यांनी प्रचाराला निर्णायक गती दिली असून हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांत बैठकींचा सपाटा लावला आहे. आयटी कर्मचारी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांनी विकास, पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेचे ठोस अजेंडा मांडला.

यावेळी आयटी नगरी हिंजवडीचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी जणू तोंडी जाहीरनामा यावेळी जाहीर करण्यात आला. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, स्वच्छता, सुरक्षा व मूलभूत नागरी सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हिंजवडी, माण, मारुंजीसह संपूर्ण गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जणू तोंडी जाहीरनामा यावेळी जाहीर झाला.

यावेळी आयटी नगरीचे सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच दिपाली जांभुळकर, माजी सरपंच विक्रम साखरे, पल्लवी गंगावणे, आजी माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गृहनिर्माण संस्थांच्या सर्व सदस्यांनी मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी धारकांनी देखील आपल्या समस्या त्यांच्याकडे व्यक्त केल्या अनेक वर्षापासून वारंवार त्या समस्या रखडले गेलेले आहेत यावर बुचडे पाटील यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत निश्चितपणे लवकर या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.

आपल्या भागाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम व सुसज्ज क्रीडांगण आपल्या भागातील उत्कृष्ट खेळाडू घडले हेच माझं मोठं ध्येय आहे.

आपल्या भागातील अनेक समस्या निश्चितपणे प्रलंबित आहेत त्या आपण शासन दरबारी त्याचा पाठपुरवठा करून निश्चित तोडगा काढू असे देखील आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

याचबरोबर कौशल्य विकास, दर्जेदार आरोग्य सुविधा, सुलभ वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यावर माझा भर राहील. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर हिंजवडी-माण परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे स्वप्न आहे.

शिवाजी बुचडे पाटील 

उमेदवार भारतीय जनता पार्टी माण हिंजवडी  जिल्हा परिषद गट


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.