आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक रद्द

नितीन देशपांडे   423   02-02-2026 23:11:54

PUNE अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलंय. उपमुख्यमंत्री बनताच सुनेत्रा पवार यांनी साताऱ्याच्या कराडमधील प्रितीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. तसेच, विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यामुळे मंत्रालयात कधी जाणार अशी चर्चा होती त्यात सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यभरात शोकाकूल वातावरण आहे. बारामतीतही आज पवार कुटुंबीयांच्या सांत्वनसाठी राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत. त्यासाठी सुनेत्रा पवार याही बारामतीत आहेत, त्याचदरम्यान सरकारनं मंत्रालयात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होत असते, मात्र उद्याची बैठक होणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

अजित पवारांचे निधन आणि राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्याची मंत्रिमंडळ बैठक होणार नाहीये. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थित होणार आहेत, अशी माहितीही सूत्रांकडून मिळालीय.

दरम्यान आज सुनेत्रा पवार या सातारा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अजितदादांटे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरी देण्याचा शब्द दिलाय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.