आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सर्वपक्षीय नेते मंडळींचा प्रचारात वाढतोय जोर; शिवाजी बुचडेनां मतदारसंघात मिळतोय मोठा पाठिंबा

नितीन देशपांडे   649   01-02-2026 15:20:44

माण हिंजवडी जिल्हा परिषद गटात प्रचारात भाजपा आघाडीवर

मारुंजी प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिंजवडी माण जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे मतदान येत्या काही दिवसात येऊन ठेपले आहे; 

हिंजवडी, माण, मारुंजी, या मोठ्या ग्रामपंचायतीचा या गटात प्रामुख्याने समावेश होतो, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी बुचडे पाटील यांच्यासाठी अनेक छुपे हात समोर येऊ लागले आहेत,

माण हिंजवडी जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी बुचडे यांचे काम करताना दिसून येत आहेत.

माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी देखील अनेक इच्छुकांसह अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधत निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले आहे याचा फायदा देखील बुचडे यांना पाहायला मिळत आहे.

अनेक आजी-माजी पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे, 

उच्चशिक्षित उमेदवार बुचडेनां आयटी हंस वाढता पाठिंबा

शिवाजी बुचडे यांच्यासारखा उच्चशिक्षित चेहरा दिल्यामुळे या भागातील आयटी वर्गाने देखील एकमुखी पाठिंबा शिवाजी बुचडे पाटील व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना दिला आहे.

पुणे जिल्हा परिषदेसाठी येत्या 7 फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले असून, ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.