आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

रक्त शुद्ध करणारे ३ सोपे नैसर्गिक उपाय, रोज करा आणि शरीरातली घाण फेकून द्या

नितीन देशपांडे   588   23-01-2026 13:47:41

रक्त शुद्ध करणारे ३ सोपे नैसर्गिक उपाय, रोज करा आणि शरीरातली घाण फेकून द्या

प्रत्येक अवयवापर्यंत शुद्ध आणि स्वच्छ रक्त पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. रक्तामध्ये जर विषारी घटक साचले, तर त्याचा परिणाम त्वचेपासून ते अंतर्गत अवयवांपर्यंत दिसून येतो.

रक्त स्वच्छ नसेल तर काय त्रास होतो?

रक्तामध्ये अशुद्धी वाढली तर त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो.

लिव्हर नीट काम करत नाही

पचनाच्या तक्रारी वाढतात

त्वचेवर पुरळ, पिंपल्स, खाज, जळजळ दिसते

सतत थकवा जाणवतो

चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज कमी होतं

ही सगळी लक्षणं रक्त शुद्ध नसल्याची असू शकतात.

रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे नैसर्गिक उपाय

Blood Purifier

१) भरपूर पाणी प्या

रोज पुरेसं पाणी पिण्याची सवय ठेवल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पाणी लिव्हर आणि किडनीला नीट काम करण्यास मदत करतं आणि रक्तातील अशुद्धी बाहेर टाकण्यास उपयोगी ठरतं. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून इतकं पाणी प्या की साधारण ६ कप लघवी तयार होईल.

Drinking Water

२) सकाळी लिंबूपाणी प्या

लिंबू रक्त आणि पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात ताजं लिंबाचा रस मिसळून प्यावा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्त स्वच्छ राहतं.

३) हळद नैसर्गिक औषध

हळद ही दाह कमी करणारी आणि जंतुसंसर्गापासून संरक्षण करणारी मानली जाते. हळदीतील करक्युमिन घटक रक्त शुद्ध करण्यास मदत करतो.

आयुर्वेदानुसार, एक कप गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे लिव्हरचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी घटक कमी होतात.

वैद्यकीय अहवालांवर आधारित आहे. कोणताही आजार किंवा त्रास असल्यास स्वतः उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.