आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

तुमच्या शहराचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी

शरद लाटे  683   22-01-2026 12:49:24

Pune 

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली.

आरक्षणाचे सविस्तर गणित

मंत्रालयात झालेल्या या सोडतीनुसार 29 महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे

अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका

अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)

इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका

सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका

या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय गणिते बदलणार असून, विशेषतः महिला आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभागातील समीकरणे आव्हानात्मक ठरणार आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सातारा, अहिल्यानगर, धुळे, जळगाव महापालिकांच्यी आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनेक दिग्गजांना धक्का बसला. अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापाैर असणार आहे. कोल्हापूर महापालिकेतही महापाैर पद हे ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे. इचलकरंजीमध्येही ओबीसी महापाैर असेल. जळगाव महापालिकेचे महापाैरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे.

 

सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या महापालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील महापाैर असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दोन्ही महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे.

राज्यातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी 8, आणि सर्वसाधारण 17 प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आलंय. आता महापाैर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.