आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पिंपरी-चिंचवडकरांचा ठाम विश्वास : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

शरद लाटे  3511   16-01-2026 21:26:23

चिंचवड | प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल केली असून, ८४ जागांवर विजय मिळवला आहे. या महाविजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वास ठेवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर नागरिकांनी पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

 या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पु) काटे यांचे अभिनंदन केले आहे. संघटनात्मक ताकद, प्रभावी नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फलित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'पिंपरी-चिंचवडकरांनी विकास, पारदर्शकता आणि सुशासनाला कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल.'

दरम्यान, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही या विजयाचे श्रेय पक्षश्रेष्ठी आणि सर्व कार्यकर्त्यांना देत नागरिकांचे आभार मानले. 'हा कौल म्हणजे पिंपरी-चिंचवडकरांनी विकासाला दिलेली मान्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी ठेवलेला विश्वास आम्ही कृतीतून सार्थ ठरवू,' असे ते म्हणाले. महानगरपालिकेत भाजपचा एकहाती महापौर बसवण्याच्या दिशेने हे यश महत्त्वाचे ठरणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.