Pune
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.
महापालिका निवडणुकीसाठ येत्या एक ते दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. "दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर सखोल चर्चा झाली असून, अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. प्रशांत जगताप हे केवळ शहराचे अध्यक्ष आहेत, तर देशाचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवार आहेत. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेनुसार, घड्याळ या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवल्या जातील," असंही धनकवडे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या युतीनंतर दोन्ही पक्ष कोणत्या चिन्हावर निवडणुका लढवतील, याबद्दलही धनकवडे यांनी स्पष्टता दिली. त्यांनी सांगितलं की, "सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची चर्चा झालेली आहे. त्यानुसार घड्याळ या चिन्हावर पुढील निवडणुका लढवल्या जातील."