आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बीड

शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?

नितीन देशपांडे   37   20-12-2025 12:04:25

PUNE NEWS 

शहराच्या राजकारणात सत्तासमीकरणे तापू लागली आहेत. वरवर सेना, भाजप-राष्ट्रवादी युती होणार असल्याचे संकेत दिले जात असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपाच्या चर्चेत एकमत होत होताना दिसत नाही.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत जागा वाटपात सन्मानजनक तोडगा निघत असेल तर महायुतीला प्राधान्य दिले जाईल. जागा वाटपात मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल विचारात घेतले जावे, हा महायुतीच्याच धोरणाचा एक भाग आहे. त्यानुसारच अहिल्यानगरसाठीही चर्चा होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील पक्षाचे पदाधिकारी तसेच आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेतली

विशेषतः विद्यमान जागांवर कोणतीही तडजोड नको, या भूमिकेवर शिंदेसेना ठाम आहे. मात्र राष्ट्रवादी, भाजपकडून एवढ्या जागा देण्यास नकार दिला जात असून 'संख्याबळाइतकीच राजकीय ताकद महत्त्वाची' असा अप्रत्यक्ष सूर लावला जात आहे. त्यामुळे शिंदेसेना युतीत राहणार की, स्वतंत्र रणशिंग फुंकणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.