तिंतरवणी प्रतिनिधी -: शिरूर तालुक्यातील तिंतरवणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे स्नेही त्रिंबकराव पंढरीनाथ कापरे यांचे आज दिनांक 19/12/2025 रोजी रात्री आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी 12 वाजता त्यांच्याव अंत्यसंस्कार करण्यात आला; यावेळी पंचक्रोशातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
तिंतरवणी ग्रुप ग्रामपंचायतचे ते जवळपास पंधरा वर्षे बिनविरोध सरपंच होते, सामाजिक राजकीय कामात त्यांचा मोठा नावलौकिक होता.
भगवान गडाला स्वतःच्या जमिनीतून रस्ता देणारा चेहरा मुकला
श्री. क्षेत्र भगवान गडाला जाणारा रस्ता स्वतःच्या शेतातून दिला
श्री क्षेत्र भगवानगड जाण्यासाठी रस्ता तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव पंडित यांच्या शब्द खातीर त्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनीत नारळ फोडून रस्त्याची पायवाट करून दिली; नंतर तोच रस्ता मोठा नॅशनल हायवे झाला माजी मंत्री शिवाजीराव पंडित नेहमी आपल्या भाषणात आमच्या पाहुण्यांनी रस्ता दिला म्हणून झाला बापूंचा उल्लेख करायचे;
त्रिंबकराव बापू कापरे यांच्या पाठीमागे भाऊ, आबासाहेब पंढरीनाथ कापरे, मुलगा विश्वंभर त्रंबकराव कापरे, तर मुली शारदा अनिरुद्ध पंडित, विमल बाळासाहेब पंडित, नातू, पंत, नातू, सुना असा नात्यागोत्याचा मोठा समूह आहे.