आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Ajit Pawar: पिंपरीत अजित पवारांचा मोठा डाव, मातोश्रीला झटका;

नितीन देशपांडे   229   16-12-2025 21:03:39

Pune news 

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्वबळाची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शड्डू ठोकला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे, असा एल्गार पुकारला आहे. त्यानंतर अजित पवारांना पहिला धक्का उद्धव ठाकरेंना दिला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. आज सकाळपासून पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून बैठकीच सत्र सुरूच आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या सर्व 33 प्रभागाच्या इच्छुक उमेदवारांसोबत अजित पवारांनी संवाद साधला.तसेच त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड शहर उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता


पिंपरी चिंचवड शहराचे शहर प्रमुख सचिन भोसले यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जाता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी पक्ष प्रवेश केल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

शहरात जोरदार राजकीय मोर्चेबांधणी


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज झालेल्या प्रवेश सोहळ्यात स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून हातात घड्याळ बांधले.

तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला


पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढावी यासाठी अजित पवारांची तुषार कामठे भेट घेणार आहेत य तुषार कामठे हे पिंपरी चिंचवडचे शरद पवार यांच्या पक्षाच्या शहराध्यक्ष असून येणारी महानगरपालिका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढावी अशी भूमिका भूमिका त्यांनी घेतली होतीय आज अजित पवार यांची भेट घेऊन तुषार कामठे करणार चर्चा करणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.